शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दापोली पोलीस ठाण्याला आग:..अन् मोठा अनर्थ टळला; पोलीस कर्मचारी गोरे व ढोले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:13 IST

..तर आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती.

शिवाजी गोरेरत्नागिरी : जिल्ह्यातील दापोलीचे ब्रिटिश कालीन पोलीस स्टेशनला आज, शनिवारी सकाळी अचानक आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केल्याने पोलीस ठाण्यातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अंमलदार धोंडू पांडुरंग गोरे व कोमल ढोले यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या दोघां कर्मचाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.पहाटे साडेसहाच्या सुमारास दापोली पोलीस स्थानकातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. यावेळी ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदार धोंडू गोरे यांच्या हे लक्षात आले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले अन् भीषण आग लागली. यावेळी ठाणे अंमलदार गोरे यांनी प्रसंगावधान राखत सर्व कर्मचाऱ्यांना सावध करुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. थोडा जरी विलंब झाला असता तर ही आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती. मात्र गोरे यांच्यामुळे मोठी हानी टळली.तर, महिला पोलीस कर्मचारी कोमल ढोले यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्या सोबत पोलीस स्टेशनच्या छतावर चढून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी आगीच्या झळीत त्या जखमी झाल्या. परंतु जीवाची पर्वा न करता त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे या दोघा कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीPoliceपोलिसfireआग