शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:39 IST

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झाला नसून, आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु कामासाठी केवळ चार महिन्यांचा ...

ठळक मुद्देविविध कारणांमुळे जलयुक्त शिवारच्या तिसरा टप्पा खडतर कामासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधीच शिल्लक जलसंपदा खात्याच्या २४ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत जलसंपदामंत्री कामाचा आढावा घेणार

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झाला नसून, आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु कामासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवास खडतर होण्याची चिन्ह आहेत.

जलयुक्त शिवार अभियान मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची निवड करून त्या गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सन २०१५-१६मध्ये निवड झालेली कामे पूर्ण झाली आहेत.

दुसऱ्या वर्षी २०१६-१७ या वर्षाची कामे अंतिम टप्प्यात असून, त्यातील १० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या वर्षी म्हणजे २०१७-१८ या वर्षाचा आराखडा तयार करून या प्रारुप आराखड्याला मंजुरी देऊन कामाचे बजेट ठरविणे गरजेचे आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील गावांची यादी तयार व्हायला विलंब झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील आराखडा अद्याप तयार झालेला नाही.

आराखडा मंजूर झाल्यावर अनुदानपत्र व कामाची वर्क आॅर्डर या सगळ्या प्रक्रियेला डिसेंबर महिना जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात काम करण्यासाठी केवळ ४ ते ५ महिने शिल्लक राहतात. या कालावधीत तिसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होणे शक्य नाही.

कालावधी कमी असल्यामुळे घाईगडबडीत कामे केल्यास ती निकृष्ट होण्याची शक्यता असते. यापूर्वीच कृषी विभाग दृष्टचक्राच्या फेऱ्यात अडकला असून, निकृष्ट दर्जाची कामे झाल्यास कृषी विभागाच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवरून यापूर्वीच दखल घेण्याची गरज होती.

जलयुक्त शिवार अभियानातील गावांची निवड होण्यासाठी विलंब लागला असल्याने पुढील कामाला विलंब होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला ७२ गावांची निवड करण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर गावाची संख्या कमी करण्याचे संकेत देण्यात आले.

गावाच्या निवडीवरूनही काही ठिकाणी राजकारण झाल्यामुळे गावांच्या अंतिम यादीला अंतिम स्वरुप देण्यात आले नाही. या विविध कारणांमुळे जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यातील गावांची निवड होऊ शकली नसल्याचे वृत्त आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. या कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावातील कामे केली जातात. परंतु गावांची यादीच निश्चित झाली नसल्याने कृती आराखडा रखडला आहे.

जलसंपदा खात्याची २४ नोव्हेंबर रोजी बैठक होत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री  प्रा. राम शिंदे या बैठकीत जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आराखडा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, येत्या दोन दिवसात तिसऱ्या टप्प्यातील अंतिम यादी व आराखडा तयार केला जाणार असून, मंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRam Shindeप्रा. राम शिंदे