रत्नागिरी : गुहागरमध्ये पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:02 IST2018-09-11T17:00:41+5:302018-09-11T17:02:49+5:30
अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले.

रत्नागिरी : गुहागरमध्ये पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे तिला अपत्यप्राप्ती झाली असून, याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने गुहागर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष गोपाल म्हसकर (४७, जानवळे, मधलीवाडी, गुहागर) याच्याविरोधात ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीचा ११ जून २०१७ रोजी वाढदिवस होता. त्याची संधी साधून आरोपी म्हसकर याने तिला वाढदिवसाला वेर्फस आणून भेट दिले. तेव्हापासून तिची आरोपीशी ओळख होऊन तिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवून या घटनेबाबत आपले नाव सांगितल्यास बदनामी करीन, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्याद देणाऱ्या अल्पवयीन मुलीने घाबरून ही बाब कोणाला सांगितली नाही. या प्रकारामुळे पीडित मुलगी गरोदर राहून तिला ९ सप्टेंबर रोजी मुलगी झाली आहे.
इच्छेविरोधात ठेवले संबंध
आरोपी हा तिच्याशी मोबाईलवरून संपर्क ठेवत असे. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये संतोषने मोबाईलवर संपर्क साधून महत्वाचे काम आहे, असे सांगितले व घरी न सांगता गुपचुप येण्यास सांगितले. ती मुलगी संबंधित ठिकाणी आल्यानंतर तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात सलग दोन दिवस शरीरसंबंध ठेवले.
आरोपीला अटक
हा गुन्हा डिसेंबर २०१७ रोजी घडला आहे. याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून संतोष म्हसकर याला रविवारी रात्री ९.५० वाजता गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी आहे. म्हसकर हा त्या मुलीच्या घराशेजारी राहणारा आहे.