शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवाला कार्यक्रमांची मेजवानी

By admin | Updated: December 13, 2015 01:14 IST

दिवाकर रावतेंना निमंत्रण : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम निश्चित

सावंतवाडी : पर्यटन महोत्सवानिमित्त सावंतवाडीनगरी चांगलीच सजू लागली आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते उपस्थित राहण्याची शक्यता असून, समारोपाला कोण येणार हे अद्याप ठरले नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. गेली आठ वर्षे सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे नेटके आयोजन करण्यात येते. महोत्सवानिमित्त विविध कलाकार सावंतवाडीत येत असतात. गेल्यावर्षीपासून सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून, पर्यटन महोत्सवाची सुरूवात करणारे दीपक केसरकर हे राज्याच्या मंत्रीमंडळात अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री आहेत. मात्र, यावर्षी २३ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पर्यटन महोत्सवाला उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यांचे येणे अद्याप निश्चित नाही. त्यांच्यासोबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हेही असणार आहेत. तर समारोपाच्या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करायचे हे निश्चित नसून, यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना प्रसिध्द् कलाकारांना आणण्याचे ठरवण्यात आले आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे दोघे कलाकारांच्या संपर्कात असून, नगराध्यक्ष साळगावकर यांनी शुक्रवारी सकाळी चित्रपट सेनेचे प्रमुख आदेश बांदेकर यांची भेट घेतली. याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, अद्यापपर्यंत पाच दिवसांचे कार्यक्रम ठरले नसले, तरी आम्ही कलाकारांच्या संपर्कात आहोत. त्यातील बरेच कलाकार हे ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्त अन्यत्र जाणार असल्याने आम्हाला वेळ मिळत नाही, असे तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)गैरहजर : शंकर महादेवनांची प्रकृती बिघडलीसावंतवाडी पर्यटन महोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखण्याचे काम सुरु आहे. याचदरम्यान, वर्षअखेर असल्याने अनेक कलाकार व्यस्त आहेत. गायक शंकर महादेवन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी येण्याचे मान्यही केले होते. पण आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते येणार नसल्याचे उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सांगितले.