झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:48 IST2017-10-25T17:42:46+5:302017-10-25T17:48:34+5:30

खेड शहराजवळील भरणे नाका येथे असलेल्या मूळच्या नांदेडमधील मुखेड येथील कमल हनुमंत ढोपारे (३१) यांनी झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भरणे नाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Female death due to excessive dose of sleeping pills | झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू

झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देचिपळूणच्या हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल , आकस्मिक मृत्यूची नोंद उपचारादरम्यान निधनपोलीस तपास करीत आहेत

खेड : शहराजवळील भरणे नाका येथे असलेल्या मूळच्या नांदेडमधील मुखेड येथील कमल हनुमंत ढोपारे (३१) यांनी झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भरणे नाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.


मयत कमल ढोपारे यांनी दि. १० ते २१ आॅक्टोबरदरम्यान झोपेच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर डोस घेतला होता. गोळ्यांचा डोस जास्त झाल्याने त्यांची तब्येत बिघडली. त्यांना चिपळूणच्या हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना परत घरी आणले.

पुन्हा तब्येत बिघडल्याने भरणे नाका येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान सोमवारी पहाटेला त्यांची प्राणज्योत मालवली.


येथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी याबाबत पोलीसात माहीती दिली. त्याप्रमाणे पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत. अधिक तपास पोलिस निरीक्षक डॅनीयल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Female death due to excessive dose of sleeping pills