शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कोकणी तरुणांच्या नशिबी जॉबडाऊन,मुंबईला परत जाण्याचाच मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:33 IST

कोकणात नोकऱ्यांचे पर्याय नाहीत, राजकीय लोक आलेले प्रकल्प घालवतात आणि नवे प्रकल्प आणत नाहीत आणि आता मुंबईत जायची सोय नाही. त्यामुळे कोरोनाच्या धसक्याने मुंबईहून गावी आलेल्या तरुणांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकही नवा प्रकल्प न येता गेल्या काही वर्षात जिल्ह्यातून प्रकल्प हद्दपारच झाले आहेत.

ठळक मुद्देकोकणी तरुणांच्या नशिबी जॉबडाऊन,मुंबईला परत जाण्याचाच मार्ग प्रकल्प हाकलले, नोकऱ्या नाहीत, गावात राहून नेमके करायचे तरी काय?

मनोज मुळ्येरत्नागिरी : कोकणात नोकऱ्यांचे पर्याय नाहीत, राजकीय लोक आलेले प्रकल्प घालवतात आणि नवे प्रकल्प आणत नाहीत आणि आता मुंबईत जायची सोय नाही. त्यामुळे कोरोनाच्या धसक्याने मुंबईहून गावी आलेल्या तरुणांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकही नवा प्रकल्प न येता गेल्या काही वर्षात जिल्ह्यातून प्रकल्प हद्दपारच झाले आहेत.शिमग्यासाठी जवळपास लाखभर मुंबईकर रत्नागिरीत आले होते. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून आलेल्या लोकांचा परतीचा मार्ग बंद झाला. पहिल्या टप्प्यापासूनच मुंबईत कोरोनाची लागण अधिक झपाट्याने होऊ लागल्याने एप्रिलपासून मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे परतू लागले. सुरूवातीच्या काळात जिल्हा बंदी असतानाही असंख्य लोक प्रशासनाकडे कोणतीही नोंदणी न करता आपापल्या गावी आले. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळे मे महिन्यात महिन्यात अधिकृत परवानेच दिले जाऊ लागले. तेव्हापासून सुमारे दोन लाखांहून अधिक लोक मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात परतले.सद्यस्थितीत तीन लाखांपेक्षा अधिक मुंबईकर रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात आहेत. यात सुमारे १० टक्के तरूण हे शिक्षणासाठी मुंबई किंवा तत्सम मोठ्या शहरात आहेत. उर्वरित लोक हे केवळ नोकरीसाठीच आपले गाव सोडून बाहेर राहात आहेत. गेल्या काही वर्षात अनेक प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर घालवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातून घालवण्यात आलेल्या प्रकल्पांची संख्याच अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा लाभला असल्याने समुद्राशी जोडलेले अनेक व्यवसाय येथे येऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना ठाम विरोध केला जात आहे. हा विरोध ठराविक लोकच करतात. कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधांचे मार्गदर्शक ठराविकच असतात. पण त्यामुळे प्रकल्प उभे राहात नाहीत आणि नोकऱ्या उपलब्ध नसल्याची खरी जाणीव आताच्या घडीला होऊ लागली आहे.किमान आता तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. प्रकल्प आले नाहीत तर स्थलांतराचे प्रमाण कायम राहील आणि इतरत्र सगळीकडे लोकसंख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र हे प्रमाण कमी होत जाईल.रिफायनरीही घालवलीतब्बल चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होऊ शकणारा रिफायनरी प्रकल्पही रत्नागिरी जिल्ह्यातून गेला आहे. प्रकल्प उभारणी काळात एक लाख, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर २0 हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी असलेला हा प्रकल्प हातचा जाऊ देण्याचा करंटेपणा जिल्ह्याने दाखवला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असते तर कोरोना संकट काळातही लोकांना आर्थिक चटके सोसावे लागले नसते. केवळ नोकरीसाठी बाहेर गेलेल्यांना गावी परतता आले असते.शिवसेनेने संधी गमावलीपुढील अनेक वर्षांसाठी उपयुक्त ठरणारा, जिल्ह्याचाच नाही तर राज्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेला प्रकल्प घालवून शिवसेनेने लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी गमावली आहे. आजही हा प्रकल्प हवाय, असे म्हणणारे स्थानिक भूमिपुत्र अधिक आहेत. मात्र, शिवसेनेने ती बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. स्थानिक शिवसैनिकांचा आवाजही शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळेच या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याचा मुद्दाही शिवसेनेने बाजूलाच टाकला आहे.फक्त परतीचाच मार्गजे तीन लाख लोक रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, त्यांना कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात जाण्याखेरीज कोणताच पर्याय नाही. कारण गावात, तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही.प्रकल्प घालवण्यात पुढेरत्नागिरी जिल्हा आतापर्यंत प्रकल्प घालवण्यातच पुढे राहिला आहे. त्यामुळे बड्या उद्योजकांनी रत्नागिरीकडे पाठच फिरवली आहे. म्हणूनच मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात कोणत्याही बड्या उद्योजकाने रत्नागिरीत प्रकल्प सुरू करण्यात स्वारस्य दाखवले नाही आणि रत्नागिरीची पाटी कोरीच राहिली आहे.पर्याय तरी द्याएक बाजू ऐकूनच रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पाला पर्याय म्हणून कोणताही प्रकल्प उभा केलेला नाही. तुकड्या तुकड्यांची शेती आणि त्या तुकड्यांमध्ये असलेले असंख्य हिस्सेदार यामुळे येथील शेती कधीच फायदेशीर होणारी नाही. मात्र, रोजगाराचे आमीष दाखवणाऱ्या शिवसेनेने कोणताही पर्यायही दिलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkonkanकोकणRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग