शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी दुनिया भोवली

By admin | Updated: July 28, 2015 00:24 IST

वाहतूक शाखेची कारवाई : बेशिस्तीला चाप लागणार

रत्नागिरी : वाहनांच्या वाढत्या संख्येप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अनेकजण आपल्या मोटारसायकलला पुढे व मागे वेगवेगळी फॅन्सी नंबर प्लेट लावून नियमांची पायमल्ली करीत आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जानेवारी २०१५ ते जून २०१५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात फक्त १६३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहतूक शाखेने १७ हजार २०० रुपये दंड वसूल केला.फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणारे दुचाकीस्वार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई होताना दिसत नाही. वाहनाच्या बाबतीत नंबरप्लेट हा महत्त्वाचा भाग आहे. नंबर प्लेटसाठी चारचाकी, दुचाकी, मालवाहक अशा वेगवेगळ्या वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे व मापाचे नियम आहेत.मात्र, या सर्व नियमांना पायदळी तुडवून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही बेशिस्त वाहनचालक दादा, भाई, आई, मराठा, नाव, आडनाव अशा अनेक प्रकारच्या शब्दामध्ये फॅन्सी नंबर बनवित आहेत. काही वाहनचालक चक्क पुढे व मागे वेगवेगळे नंबर टाकून मोठ्या ऐटीत आपली वाहने मिरवत आहेत.अशा प्रकारे फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला लावल्याने एखादा अपघात झाल्यावर अशा वाहनांची माहिती मिळणे अवघड बनते. जिल्ह्यात फिरणाऱ्या फॅन्सी नंबरप्लेट वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.याबाबतीत केवळ वाहन चालकांवरच नव्हे; तर अशा नंबर प्लेट बनवून देणाऱ्यांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. अशा कारवाईमुळे कायद्याचे उल्लंघन होणाऱ्या घटनांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फॅन्सी नंबरप्लेट वाहन चालकांनी लक्ष वेधून घेतल्याने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)