मच्छीमार बोटीवरील फॅन चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:23+5:302021-05-31T04:23:23+5:30
राजापूर : तालुक्यातील नाणार - इंगळवाडी येथील मच्छीमार बोटीवर काढून ठेवलेला सुमारे ४० हजार रूपये किमतीचा फॅन चाेरीला गेला ...

मच्छीमार बोटीवरील फॅन चोरीला
राजापूर : तालुक्यातील नाणार - इंगळवाडी येथील मच्छीमार बोटीवर काढून ठेवलेला सुमारे ४० हजार रूपये किमतीचा फॅन चाेरीला गेला आहे़ याप्रकरणी नाटे पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरूवार, २७ मे रोजी रात्री ९ ते २८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडला़
याप्रकरणी मुसव्वीर सजऊद्दीन साखरकर (रा. नाणार - इंगळवाडी) यांनी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे़ अलनजाकत दीलानी (बाेट क्रमांक आयएनडी एमएच एमएम ३१२१) या बोटीवरील सुमारे ४० हजार रूपये किमतीचा ३५ गेजचा फॅन काढून ठेवण्यात आला हाेता. हा फॅन चाेरीला गेल्याचे साखरकर यांनी फिर्यादीत म्हटले असून, काही संशयितांची नावेही त्यांनी फिर्यादीत दिली आहेत़ या चाेरीप्रकरणी २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास नाटे पाेलीस करत आहेत.