भर पावसातही वाळूचे उत्खनन

By Admin | Updated: August 17, 2014 22:34 IST2014-08-17T22:03:37+5:302014-08-17T22:34:44+5:30

खेड तालुका : राजकीय हस्तक्षेप झाल्याची जोरदार चर्चा

Extraction of sand in the rainy season | भर पावसातही वाळूचे उत्खनन

भर पावसातही वाळूचे उत्खनन

खाडीपट्टा : तालुक्यातील खाडीपट्टा भागात खेड महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने भरपावसाळ्यातही वाळूचे उत्खनन सुरुच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या वाळू उत्खनन प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे महसूल यंत्रणादेखील कुचकामी ठरत आहे. बुधवारी (१३ रोजी) खाडीपट्ट्यातील भागात बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करुन त्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या शहरातील क्षेत्रपालनगर येथे प्रांताधिकाऱ्यांनी पकडल्या. गेले काही दिवस ‘लोकमत’ने याप्रकरणी प्रकाशझोत टाकल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करण्याचा हा देखावा केल्याची चर्चा खेड शहर परिसरात रंगली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून वाळू उत्खननावर बंदी असताना गेले काही महिने तालुक्यातील खाडीपट्टा भागातून जगबुडी, दाभोळ खाडीतून वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. पावसाळ्यात वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करुन ठेवलेला आहे. काही ठिकाणी उत्खनन होत असल्याचेही समोर येत आहे.
खाडीपट्ट्यातील वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने शहरातील क्षेत्रपालनगर येथे पकडण्यात आली. ही दोन्ही वाहने तहसील आवारात आहेत. याबाबत खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता ही वाळू खाडीपट्ट्यात साठवण करुन ठेवण्यात आल्याचे ट्रक चालकाने आपल्या जबाबात म्हटले आहे. याची संपूर्ण चौकशी करुन संबंधित मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. (वार्ताहर)

पकडण्यात आलेली वाळू ही खाडीपट्ट्यात साठवण करुन ठेवलेली होती. असे ट्रकचालकाने आपल्या जबाबात म्हटले आहे. यासंबंधी संपूर्ण चौकशी करुन संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- प्रकाश संकपाळ, तहसीलदार

खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागात भर पावसात वाळू उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष.
खाडीपट्ट्यातील अशा अनधिकृत उत्ख़ननाविरूध्द महसूल अधिकाऱ्यांकडून कारवाईचा केव केला जातोय फार्स.
कारवाईचा फार्स नको.

Web Title: Extraction of sand in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.