Exit road on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी रस्त्याला भगदाड
मुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी रस्त्याला भगदाड

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी रस्त्याला भगदाडपर्यायी मार्गावरील वाहतूक बंद

खेड : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा असलेला नातूनगर- विन्हेरे- महाड रस्त्याला ऐन गणेशोत्सव कालावधीत मोठे भगदाड पडल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कशेडी घाट पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी खचला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास महामार्गावरील वाहतूक नातूनगर - तुळशी - विन्हेरे मार्गाने वळविण्यात येते. मात्र नातूनगर विन्हेरे मार्गे मुंबईकडे जाणारा रस्ता महाड तालुक्यातील फाळकेवाडी या भागात काल गुरुवारी सायंकाळी खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


Web Title: Exit road on Mumbai-Goa highway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.