विजयराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजपासून जिल्ह्यात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:22 AM2021-07-08T04:22:04+5:302021-07-08T04:22:04+5:30

रत्नागिरी : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा काँग्रेस ...

Events in the district from today to pay homage to Vijayrao Bhosale | विजयराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजपासून जिल्ह्यात कार्यक्रम

विजयराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजपासून जिल्ह्यात कार्यक्रम

Next

रत्नागिरी : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे ८ जुलैपासून विविध तालुक्यांमध्ये शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यात गुरुवार, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देवरूख येथील अनिल भुवड शहर अध्यक्ष यांच्या मंडपात होणार आहे.

लांजा तालुक्यासाठी शुक्रवार, ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लांजा तालुका काँग्रेस कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

गुहागर तालुक्यात शनिवार, १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळी, जानवले फाटा येथे होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता चिपळूण तालुक्यासाठी शहर तालुक्यातील धवल हॉल, दुसरा माळा येथे होणार आहे. याच दिवशी खेड तालुक्यासाठी सकाळी ११ वाजता नगरपालिका हॉलमध्ये होणार आहे.

दापोली, मंडणगड तालुक्यासाठी रविवार, ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दापोली पेंशनर हॉल येथे कार्यक्रम होणार आहे.

राजापूर तालुक्यासाठी मंगळवार, १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राजापूर काँग्रेस कार्यालयात कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी शहरातील काँग्रेस भुवन येथे ऑनलाइन शोकसभा होणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका, शहर, सर्व फ्रंटल सेल, विभाग पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. सर्व प्रांतिक जिल्हा पदाधिकारी तालुका, शहर काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्या-त्या तालुक्यांत शोकसभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रवक्ता अशोक जाधव यांनी केले आहे.

Web Title: Events in the district from today to pay homage to Vijayrao Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.