शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:03 IST

चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

चिपळूण : पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पुराची दाहकता वाढते. यावर पावसाळा कालावधीत धरणातीलपाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सूचविण्याकरीता अभ्यास गटाची स्थापन करण्यात आली आहे. या समितीत शासकीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा समावेश आहे.चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबर रोजी बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पुराची दाहकता वाढते असे चिपळूण बचाव समिती सदस्य यांनी नमूद केले होते. याबाबत वस्तुस्थितीचा अभ्यास करुन उपाययोजना सूचविण्याकरीता निवृत्त मुख्य अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.या निर्देशानुसार अभ्यास गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे पुराची दाहकता वाढते यावर पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सूचविण्याकरीता अभ्यास गट स्थापन करणेस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.या समिती अध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त मुख्य अभियंता दिपक मोडक, सदस्यपदी महाजेनको, पोफळीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली ग. नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, केएलई इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान, हुंबळीचे स्थापत्य अभियांत्रिकी  प्रमुख डॉ. शरद जोशी, चिपळूण रहीवाशी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश पाटणकर, ॲग्रो टुरिझम, चिपळूणचे संजीव अणेराव, सदस्य सचिवपदी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार व पाटबंधारे विभाग, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता ज.म.पाटील यांची नियुक्ती झाली आहे.या समितीमार्फत जुलै २०२१ च्या महापूरामध्ये कोयना अवजल विसर्गामुळे चिपळूण शहर व परिसरावर झालेला परिणाम तसेच त्या कालावधीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या परिमाणाचे दृढीकरण व विसर्ग सोडण्याची कारणमिमांसा करणे, कोळकेवाडी अवजलाचा महत्तम विसर्ग, महत्तम भरती पातळीचे वेळी चिपळूण शहर परिसरात होणारा परिणाम, कोळकेवाडी ते वाशिष्ठी नदीच्या वहनक्षमतेबाबत अभ्यास करून त्यावेळी प्रकल्प अहवालामध्ये अवजल सोडणेची तरतूद केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाDamधरणWaterपाणी