तेजस एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:54 IST2025-01-22T11:54:11+5:302025-01-22T11:54:31+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर मुंबईहून मडगावला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीनजीकच्या करबुडे येथे तांत्रिक बिघाड ...

संग्रहित छाया
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर मुंबईहून मडगावला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीनजीकच्या करबुडे येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र, रत्नागिरीहून तातडीने डिझेल इंजिन आणण्यात आले.
सुमारे पाऊण तासाच्या विलंबानंतर ही रेल्वे सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास रवाना झाली. ही रेल्वे करबुडे येथे काहीकाळ थांबून राहिल्याने या दरम्यान असलेल्या काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले हाेते.
तेजस एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही गाडी करबुडे येथे थांबविल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली हाेती. अखेर रत्नागिरीहून दुसरे इंजिन आणून ते तेजसला जोडण्यात आले. त्यामुळे सुमारे पाऊण तासाच्या विलंबानंतर ही गाडी रत्नागिरीतून सोडण्यात आली. मात्र, ही गाडी थांबून राहिल्याने या मार्गावरील मांडवी, मंगला, लक्षद्वीप एक्स्प्रेस, दिवा एक्स्प्रेस या गाड्या थोड्या विलंबाने धावल्या, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.