शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर

 

 नाशिक : अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली असून, अपेक्षेप्रमाणे विज्ञान शाखेसाठी प्रचंड चुरस दिसून आली. विज्ञान शाखेचे खुल्या प्रवर्गासाठीचे प्रवेश ९१ ते ९३ टक्क्यांपर्यंत निश्चित झाले आहेत, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्येदेखील गुणांची स्पर्धा दिसून आली. या प्रवर्गातील कट आॅफ लिस्ट ८५ ते ९० टक्क्यांवर क्लोज झाली. गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर गुणवत्ता यादी लावण्यात आली होती, तर बहुतांश महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी प्रकाशित केली. त्यामुळे दरवर्षी यादी पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आले. शहरातील सर्व महाविद्यालयांनी दुपारी साडेतीन वाजेपासून गुणवत्ता यादी जाहीर करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक महाविद्यालयांत अर्ज दाखल केले होते अशा विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांतीलही यादी पाहता आली. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने गुणवत्ता यादी करताना महाविद्यालयाची चांगलीच दमछाक झाली. सर्व सामाजिक आरक्षणे, संस्था कोटा, खेळाडूंचा कोटा तसेच विशेष विद्यार्थी कोटा सांभाळून गुणवत्ता यादी करण्याची कसरत महाविद्यालयांना करावी लागली. खुल्या आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांनीदेखील यंदा भरघोस गुण मिळविल्याने कट आॅफमध्ये फारसा फरक नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. शुक्रवारपासून म्हणजेच ४ तारखेपासून प्रवेश सुरू होणार आहेत. सदर प्रवेशाची प्रक्रिया ही सोमवार, दि. ७ पर्यंत सुरू राहणार आहे. ८ तारखेला दुसरी गुणवत्ता यादी म्हणजेच प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)