शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:20 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी ) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच गाडीतील वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढल्याने माेठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कार पूर्ण जळून २५ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.याबाबत विश्वनाथ गंगाराम पवार (७४, रा. हुनमाननगर, विलेपार्ले, मुंबई) यांनी पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, रविवारी ते पत्नी वंदना पवार आणि आपल्या चालकासह कार (एमएच ०२, व्हीटी ४६३३) मधून मुंबई ते ओणी असा प्रवास करत होते. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरील निवळी-कोकजेवठार येथे आले असता, त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने पवार दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.ही बाब आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस, अग्निशमन दल आणि हातखंबा वाहतूक पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच घटनास्थळी दाखल हाेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल रुपेश भिसे करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगhighwayमहामार्ग