वृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:30 IST2019-03-19T15:27:16+5:302019-03-19T15:30:26+5:30

राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

The elderly committed sexual harassment at Chimudiri, the accused was sentenced | वृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जेरबंद 

वृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जेरबंद 

ठळक मुद्देवृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचारआरोपी जेरबंद, अधिक तपास नाटे पोलीसाकडे

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

अंगणात खेळत असणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका ७२ वर्षाच्या वृध्दाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीसानी या नराधम वृध्दाला जेरबंद केले असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची चिमुरडी शेजारी खेळायला गेली होती. सायंकाळी ती घरी आली असता तिला त्रास होत असल्याचे पाहून आजीने विचारणा केली असता शेजारच्या आजोबांनी केलेले घाणेरडा प्रकार मुलीने सांगितला.

संतप्त झालेल्या कुटुंबियांनी या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपण काहीच केले नाही असा पवित्रा त्या व्यक्तीने घेतला. संतप्त पालकांनी संयम राखत थेट नाटे पोलीस स्टेशन गाठले व याप्रकरणी त्या वृध्दाच्या विरोधात तक्रार केली.

या घटनेचे गाम्भीर्य ओळखत नाटे पोलीसानीही तत्काळ करवाई करीत रात्री १२ वाजताच वृद्धाला ताब्यात घेतले. या वृध्दाविरोधात बाललैंगिंक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे.

याप्रकरणी नाटे पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, पोलीस उपनिरीक्ष श्वेता पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचेही स्वागत होत असुन या प्रकरणी श्वेता पाटील अधिक तपास करत आहेत.

Web Title: The elderly committed sexual harassment at Chimudiri, the accused was sentenced