शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

लांजा तालुक्यातील देवधे येथील माथेफिरू तरूणाचा आठजणांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:55 AM

त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिविगाळ करत होता. मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही.

ठळक मुद्दे- आठपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर

लांजा : हातामध्ये कोयता घेऊन एका माथेफिरू तरूणाने आपल्या शेजाऱ्यांच्या घरात घुसून समोर येईल त्यांच्यावर सपासप वार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी लांजा तालुक्यातील देवधे येथे घडला. या प्रकारात ५ महिला, ३ पुरूष, १ बालक असे आठजण जखमी झाले असून, त्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. इतक्या लोकांवर खुनी हल्ला केल्यानंतर हा माथेफिरू तरूण पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  देवधे गुरववाडी येथील प्रमोद यशवंत गुरव (३५) याला गांजा ओढण्याचे व्यसन आहे. व्यसनाधिन अवस्थेत त्याने याआधीही खूनी हल्ला केला आहे. जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी त्याला शिक्षाही झालेली आहे. शिक्षा भोगून दोन वषार्पूर्वी तो देवधे येथे आला होता. त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिविगाळ करत होता. मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही.

बुधवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास प्रमोद हातामध्ये कोयता घेऊन वाडीमध्ये फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र तो एवढा आक्रमक होईल, याची पुसटशी कल्पना कोणालाच नव्हती. फिरता फिरता तो शेजारी राहणाºया अस्मिता गुरव यांना शिविगाळ करत त्याने त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत केला. त्याची ही अवस्था पाहून घरातील लोकांनी सर्व दरवाजे बंद करून घेतले. मात्र दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्याने अस्मिता संदिप गुरव (३४) यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा फोडला. आत शिरताच त्याने अस्मिता गुरव यांच्या हातावर व मानेवर वार केला.

अस्मिता यांच्या सासूने आरडाओरडा केल्यानंतर प्रमोद तेथून बाहेर पडला आणि त्याने आपला मोर्चा भास्कर दत्तात्रय पाटकर (५३) यांच्या घराकडे वळविला आणि त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी भास्कर यांचा मुलगा गौरव व पत्नी शुभांगी भास्कर पाटकर (५०) सोडविण्यासाठी गेले असता प्रमोदने शुभांगी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये हे दापत्य गंभीर जखमी झाले आहे.बेभान झालेला प्रमोद त्यानंतर वैशाली अशोक गुरव (५२) यांच्या घरात घुसला आणि त्याने वैशाली यांच्या मानेवर वार केला. वैशाली हिची नात अक्षरा आशिष गुरव (२०)  हिने प्रमोदला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रमोदने तिच्याही डोक्यात व मानेवर वार केला. अर्धांगवायू आजाराने घरामध्ये असलेला आशिष अशोक गुरव यांच्यावर तसेच त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आयुश याच्यावर हल्ला केला. आशिषला निसटती दुखापत झाली आहे.

चौथ्या घरामध्ये प्रमोदने सुलोचना मारुती गुरव (६१) यांच्या मानेवर वार केला. त्याच्या वाटेमध्ये जे कोणी आले, त्यांच्यावर तो हल्ला करत होता. वाडीमध्ये मोठा आरडाओरडा झाल्यामुळे ग्रामस्थ गोळा झाले. मिळेल त्या गाडीने सर्व जखमींना लांजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी