लांजा तालुक्यातील देवधे येथील माथेफिरू तरूणाचा आठजणांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 09:55 AM2019-11-21T09:55:25+5:302019-11-21T09:57:25+5:30

त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिविगाळ करत होता. मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही.

Eight killed in Mathefiru youth attack | लांजा तालुक्यातील देवधे येथील माथेफिरू तरूणाचा आठजणांवर प्राणघातक हल्ला

लांजा तालुक्यातील देवधे येथील माथेफिरू तरूणाचा आठजणांवर प्राणघातक हल्ला

Next
ठळक मुद्दे- आठपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर

लांजा : हातामध्ये कोयता घेऊन एका माथेफिरू तरूणाने आपल्या शेजाऱ्यांच्या घरात घुसून समोर येईल त्यांच्यावर सपासप वार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी लांजा तालुक्यातील देवधे येथे घडला. या प्रकारात ५ महिला, ३ पुरूष, १ बालक असे आठजण जखमी झाले असून, त्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. इतक्या लोकांवर खुनी हल्ला केल्यानंतर हा माथेफिरू तरूण पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  देवधे गुरववाडी येथील प्रमोद यशवंत गुरव (३५) याला गांजा ओढण्याचे व्यसन आहे. व्यसनाधिन अवस्थेत त्याने याआधीही खूनी हल्ला केला आहे. जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी त्याला शिक्षाही झालेली आहे. शिक्षा भोगून दोन वषार्पूर्वी तो देवधे येथे आला होता. त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिविगाळ करत होता. मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही.

बुधवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास प्रमोद हातामध्ये कोयता घेऊन वाडीमध्ये फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र तो एवढा आक्रमक होईल, याची पुसटशी कल्पना कोणालाच नव्हती. फिरता फिरता तो शेजारी राहणाºया अस्मिता गुरव यांना शिविगाळ करत त्याने त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत केला. त्याची ही अवस्था पाहून घरातील लोकांनी सर्व दरवाजे बंद करून घेतले. मात्र दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्याने अस्मिता संदिप गुरव (३४) यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा फोडला. आत शिरताच त्याने अस्मिता गुरव यांच्या हातावर व मानेवर वार केला.

अस्मिता यांच्या सासूने आरडाओरडा केल्यानंतर प्रमोद तेथून बाहेर पडला आणि त्याने आपला मोर्चा भास्कर दत्तात्रय पाटकर (५३) यांच्या घराकडे वळविला आणि त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी भास्कर यांचा मुलगा गौरव व पत्नी शुभांगी भास्कर पाटकर (५०) सोडविण्यासाठी गेले असता प्रमोदने शुभांगी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये हे दापत्य गंभीर जखमी झाले आहे.
बेभान झालेला प्रमोद त्यानंतर वैशाली अशोक गुरव (५२) यांच्या घरात घुसला आणि त्याने वैशाली यांच्या मानेवर वार केला. वैशाली हिची नात अक्षरा आशिष गुरव (२०)  हिने प्रमोदला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रमोदने तिच्याही डोक्यात व मानेवर वार केला. अर्धांगवायू आजाराने घरामध्ये असलेला आशिष अशोक गुरव यांच्यावर तसेच त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आयुश याच्यावर हल्ला केला. आशिषला निसटती दुखापत झाली आहे.

चौथ्या घरामध्ये प्रमोदने सुलोचना मारुती गुरव (६१) यांच्या मानेवर वार केला. त्याच्या वाटेमध्ये जे कोणी आले, त्यांच्यावर तो हल्ला करत होता. वाडीमध्ये मोठा आरडाओरडा झाल्यामुळे ग्रामस्थ गोळा झाले. मिळेल त्या गाडीने सर्व जखमींना लांजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Eight killed in Mathefiru youth attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.