जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना
By मेहरून नाकाडे | Updated: October 15, 2023 17:41 IST2023-10-15T17:41:14+5:302023-10-15T17:41:23+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.१५) घटस्थापना करण्यात आली. जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची ...

जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना
रत्नागिरी: जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.१५) घटस्थापना करण्यात आली. जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ९० ठिकाणी फोटोपूजन केले जाणार आहे. शहरात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे सकाळी ५.४५ दूर्गादाैडचेही आयोजन करण्यात आले होते. लहान मुले दूर्गादाैडमध्ये बहुसंख्येने सहभागी झाली होती.
रविवारी सकाळी देवीची मूर्ती ढोल ताशाच्या गजरात, वाद्यवृंदाच्या तालावर गुलालाची उधळण करीत मिरवणुकीने मंडपात आणण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी आधीच मंडप सजावट करून सज्ज ठेवले होते. जिल्ह्यात ४२४ सार्वजनिक मंडळांतर्फे, तर ५२ खासगी ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
९० ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी खास मंडप सुशोभित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३६ हजार ६२९ ठिकाणी खासगी, तर १७४ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना केली जाणार आहे.