शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

संगमेश्वर तालुक्यात डंपर-दुुुुचाकीत धडक, भीषण अपघातात दुुुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 3:01 PM

Accident Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला . या अपघातात दुचाकीस्वार याच्या डोक्यावरूनच डंपरचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

ठळक मुद्देसंगमेश्वर तालुक्यात डंपर-दुुुुचाकीत धडक भीषण अपघातात दुुुचाकीस्वार जागीच ठार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला .या अपघातात दुचाकीस्वार याच्या डोक्यावरूनच डंपरचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार याबाबतची फिर्याद मुरडव गावचे पोलीस पाटील राजेंद्र मेणे यांनी दिली आहे. सकाळी मुरडव बाटेवाडीत राहणारा योगेश तुकाराम बाटे हा तरुण आरवलीहून मुरडवकडे दुचाकी (एमएच ०४ डीएच १९८३) ने चालला होता.

मुरडव येथील छोट्याशा वळणावर येताच समोरून येणाऱ्या डंपर (एमएच ०४ सीयू ९६६३) यांच्यात धडक झाली. दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूला धडकली.याच वेळी योगेश डंपर च्यामागील चाका खाली आला आणि डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेले. ही धडक एवढी मोठी होती की, दुुुचाकीस्वार योगेश बाटे जागीच ठार झाला.भीषण धडकेमुळे योगेश बाटेच्या डोक्याला जबर दुखापत होऊन मेंदू बाहेर पडला. अपघाताची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलीस चेकपोस्टवरील पोलीस गणेश बिक्कड,पोलीस ग्रामस्थ संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडविलकर,आदी ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले व योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर ३०४(अ)३३७,३३८,२७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी