शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

बंद मंडल कार्यालयामुळे ग्रामस्थ हैराण

By admin | Updated: October 24, 2015 00:54 IST

खेड तालुका : लवेलमधील प्रकाराने ग्रामस्थांमध्ये नाराजी

आवाशी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी लवेल (ता. खेड) येथील तलाठी व मंडल कार्यालय कोणतीही सूचना प्रसिद्ध न करताच बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय झाली.शनिवारी अर्ध्या दिवसानंतर रविवारी शासकीय कार्यालयांना पूर्ण दिवस सुटी असते. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयीन कामकाज पूर्ववत करण्यासाठी त्या त्या कार्यालयाच्या संबंधितांनी हजर राहणे गरजेचे असते. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून तलाठी, मंडल, तहसील, जिल्हा कार्यालयापर्यंत शासकीय कामे करण्यासाठी ग्रामस्थ त्या त्या कार्यालयातून जात असतात. मात्र, लवेल येथील तलाठी व मंडल कार्यालय सोमवार, दि. १९ रोजी सकाळी १२.३० वाजेपर्यंत उघडलेच नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली.कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे दिवस व फिरतीचे दिवस लिहिण्यात आले आहेत. मात्र, सोमवारी कार्यालय बंद राहणार आहे, अशी सूचना कुठेही दिसली नाही. येथे उपस्थित असलेले हरिश्चंद्र घाग, महेंद्र आंब्रे (आवाशी), शौकत घारे (असगणी), यशवंत अमरे (लवेल), चंद्रकांत म्हादलेकर (दाभिळ) यापैकी काहींनी तलाठ्यांना दूरध्वनी केला असता शासकीय प्रशिक्षणासाठी जिल्हा कार्यालयात गेले असल्याचे सांगण्यात आले.कोतवाल म्हणून काम पाहणाऱ्या वाडेकर यांचा दूरध्वनीही बंद होता. त्यामुळे आज सोमवारी सुटी आहे की, कार्यालय बंदच राहणार आहे. याबाबत लोकांना काही समजायला मार्ग नव्हता. मात्र, उशिराने मिळालेल्या माहितीनुसार वाडेकर दुपारनंतर कार्यालयात आल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)सुटीचा दिवसवगळता आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सरकारी कार्यालय बंद असू नये, असे धोरण आहे. या दिवशी अधिकारी भेटत असल्याने ग्रामस्थ कार्यालयात कामासाठी येतात. मात्र, खेड तालुक्यातील लवेल येथील मंडल कार्यालय बंद ठेवल्याने गैरसोय झाली.