Ratnagiri News: दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनची गळफास घेऊन आत्महत्या
By अरुण आडिवरेकर | Updated: May 5, 2023 17:33 IST2023-05-05T17:33:18+5:302023-05-05T17:33:32+5:30
रत्नागिरी : दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनने स्वत:च्या हातावर काचेने जखमा करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला ...

Ratnagiri News: दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी : दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनने स्वत:च्या हातावर काचेने जखमा करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही घटना ४ मे राेजी सायंकाळी ४:०० वाजता जुना माळनाका येथील शंखेश्वर प्लाझा येथे घडली. हरी भक्ता थडेरा (३२, मूळ रा. बाबिया चाेर, ता. पंचपुरी, सुरकेत, नेपाळ, सध्या रा. शंखेश्वर पार्क, जिल्हा परिषदजवळ, जुना माळनाका, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
हरी थडेरा हा शहरात वाॅचमनचे काम करत हाेता. गुरुवारी दारुच्या नशेत त्याने डाव्या हाताच्या मनगटावर काचेने जखमा केल्या. त्यानंतर ओढणीने लाेखंडी ग्रीलला एक टाेक बांधून दुसऱ्या बाजूला गळफास घेऊन बांधावरून उडी मारली. त्याच्या मानेला फास बसल्याने ताे बेशुद्ध झाला. त्याच्या नातेवाइकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.