चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल पुलावर उलटलेल्या टँकरखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव वेगातील हा टँकर उलटत असताना त्यातून चालकाने बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तो टँकरखाली सापडला असल्याचा अंदाज आहे. बबन महादेव ढगे (६२, सांगली) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.कुंभार्ली घाटामार्गे हा रिकामा पाण्याचा टँकर चिपळूणच्या दिशेने येत होता. तो पिंपळी येथील कॅनॉल पुलावर आला तेव्हा चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर कलंडू लागला. हे लक्षात येताच बबन ढगे यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टँकर उजव्या बाजूला उलटला. या टँकरखाली ढगे सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी थार गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.टँकर अपघातानंतर काही वेळ मार्गावर वाहतूक कोडी झाली होती. या घटनेची माहिती समजताच चिपळूण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली.
Web Summary : In Ratnagiri, a tanker driver died after jumping from his overturning vehicle. The incident occurred near Chiplun when the tanker lost control and flipped. The driver, Baban Dhage, was crushed and died instantly. This area has seen fatal accidents before.
Web Summary : रत्नागिरी में, एक टैंकर चालक ने पलटते वाहन से कूदने की कोशिश की और उसकी मौत हो गई। चिपलूण के पास टैंकर अनियंत्रित होकर पलटा। चालक, बबन ढगे, कुचल गए और मौके पर ही उनकी मृत्यु हो गई। इस क्षेत्र में पहले भी घातक दुर्घटनाएँ हुई हैं।