चालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:21 IST2019-10-18T11:20:01+5:302019-10-18T11:21:48+5:30
चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

चालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविले
चिपळूण : चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
लातूर- चिपळूण - खेड (एमएच १३, सी यू ६८४४) ही एस्. टी. बस घेऊन चालक धनंजय दत्तात्रय पन्हाळे जात होते. त्यांचेसमवेत वाहक पंकज उध्दव पोटफोडे हे होते. ही बस गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने खेर्डी येथे आली.
चालक धनंजय दत्तात्रय पन्हाळे यांना झोप अनावर झाल्याने त्याचवेळी गाडीवरील ताबा सुटला. गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या एमएच ०८, ऐ एच ८०३८ या दुचाकीला धडकली. त्यानंतर बसने दुचाकीला फरफटत नेले.
दुचाकीस्वारांनी आपल्या ताब्यातील दुचाकी तत्काळ सोडून दिली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) या दोघांना गंभीर दुखापत झाली. या दोघांनाही तत्काळ एसएमएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर चिपळूण पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी आणि आॅल इंडिया आर. पी. एफ. जवान हजर झाले.