जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:12 IST2020-09-22T15:11:55+5:302020-09-22T15:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस ...

पोलीस दलातर्फे रत्नागिरीत स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचे हे पद रिक्त झाले आहे. या रिक्त झालेल्या पदावर मोहितकुमार गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस दलातर्फे विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. गर्ग यांनी रत्नागिरीतील कामकाजाची माहिती घेतली. तसेच शहर पोलीस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.
दोनवेळा पोलीस महासंचालकांकडून पदक मिळवणारे डॉ. गर्ग गडचिरोलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. ते पदोन्नतीने या पदावर रूजू होत आहेत. ते एमबीबीएस असून, मूळचे पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील आहेत. ते सन २०१४च्या बॅचमधील आयपीएस असून, पहिली पोस्टिंग त्यांची मणिपूरला झालेली होती. जून २०१८मध्ये ते महाराष्ट्र केडरला आले. मणिपूर तसेच गडचिरोलीत केलेल्या उत्तम कामामुळे त्यांना दोनवेळा पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे.
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं