रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:09 PM2020-05-04T13:09:55+5:302020-05-04T13:25:16+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

District administration appeals to Ratnagirikar | रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फेसबुक लाईव्हनागरिकांच्या प्रश्नांना दिली उत्तर-- शिथिलतेचा गैरफायदा घेऊ नकाकोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन

रत्नागिरी : शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांमुळे अडकलेल्या लोकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे उपस्थित होते. तब्बल २ हजार लोकांनी जिल्हा प्रशासनाचे फेसबुक लाईव्ह पाहिले. ८० लोकांनी पेज शेअर केले असून, ३५० लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले.

यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करा. रेडझोनमधून येऊ शकतो का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रेडझोनमधून कोणीही येऊ शकणार नसल्याचे सांगितले. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असाल तर जवळच्या पोलीस स्थानकाकडे अर्ज करावा. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन परवानगी देण्याबाबत विचार होईल, असे सांगितले.

कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल किंवा हॉटस्पॉटमध्ये व्यक्ती जाऊन आलेली असेल अशा लोकांना क्वॉरंटाईन होणे आवश्यक आहे, अशी माहिती कान्हुराज बघाटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नयेत, असे स्पष्ट संकेत शासनाचे आहेत. त्यांना जास्त धोका आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र राहता कामा नयेत. योग्यत्या सर्वप्रकारच्या काळजी घेऊन सर्व आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.

ज्या लोकांना बाहेरून रत्नागिरीत यायचे असेल तर पास घेणे अनिवार्य आहे. प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वर्गीकरण करेल त्यानुसार नियोजन केले जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, असेही सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

 

Web Title: District administration appeals to Ratnagirikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.