टेंभ्ये गावात आराेग्य विषयक साहित्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:34+5:302021-05-31T04:23:34+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये गावचे सुपूत्र संतोष शांताराम साळवी यांनी गावातील ग्रामस्थांच्या आराेग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, ...

टेंभ्ये गावात आराेग्य विषयक साहित्यांचे वाटप
रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये गावचे सुपूत्र संतोष शांताराम साळवी यांनी गावातील ग्रामस्थांच्या आराेग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, स्टीमर यासारख्या आरोग्यविषयक साहित्य दिले आहे़ या साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले़
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्राथमिक सुरक्षेसाठी लागणारे मास्क व सॅनिटायझरवगळता अन्य साहित्य खरेदी करणे सर्वांनाच शक्य नाही. उद्योजक संतोष शांताराम साळवी व्यवसायामुळे मुंबईत स्थायिक असले तरी सामाजिक बांधीलकीतून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आरोग्यविषयक साहित्याचे वाटप केले. साळवी यांनी टेंभ्ये गावातील सर्व वाड्या-वाड्यांमध्ये घरोघरी साहित्य दिले असून, गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, मंदिरांमध्येही साहित्य दिले आहे. ज्येष्ठ नागरिक गणपत गंगाराम साळवी यांच्या मुख्य उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच संतोष सदानंद साळवी, नरेंद्र गणपत साळवी, विश्वनाथ तथा बापू साळवी, विजय साळवी, सिद्धेश साळवी आदी उपस्थित होते.
-------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथील उद्योजक संतोष शांताराम साळवी गावासाठी दिलेल्या आराेग्य विषयक साहित्याचे ज्येष्ठ नागरिक गणपत साळवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अन्य ग्रामस्थ उपस्थित हाेते़