शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी डिजिटल बोर्ड

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही,

गुहागर : समुद्राच्या भरती - ओहोटीची वेळ बदलती असल्याने गुहागर समुद्र किनाऱ्यावर डिजिटल बोर्डद्वारे वेळ सूचित करण्यासाठी पुढील काळात डिजिटल बोर्ड बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ही माहिती प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली.गुहागर समुद्रकिनारी येणारे पर्यटक अतिउत्साहाने समुद्र स्नानासाठी उतरतात. मात्र, खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू होतो. हे प्रकार रोखण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमध्ये निमंत्रितांची विशेष बैठक घेऊन त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा केली.यावेळी हजारे म्हणाले की, भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही, असे माझे मत आहे. येणारे पर्यटक हे अतिउत्साहाच्या भरात खोलवर पाण्यामध्ये जातात. समुद्राच्या भरती - ओहोटीच्या वेळी पाण्यामधील होणाऱ्या बदलाबाबत पर्यटक अनभिज्ञ असतात. अशावेळी पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.यावेळी निसर्गाशी मस्ती करु नका, अशा आशयाचे फलक लावावेत, अशी सूचना राजन दळी यांनी केली. यावर नगरपंचायत व बंदर विभागामार्फत समुद्रकिनाऱ्यावरील प्रवेशाचा भाग व जेटीवर फलक लावणे तसेच हे फलक आकर्षक व एकाच रंगाचे असावेत, असे सुचवण्यात आले.नगरपंचायतीतर्फे सुरक्षेसाठी ४० लाईफ जॅकेट देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी जाहीर केले. आॅक्टोबर ते जून या कालावधीत पर्यटकांसाठी स्पीडबोट सेवा सुरू असते. मागील दोन वर्षात या कालावधीमध्ये बुडणाऱ्या पर्यटकांना वेळीच पोहोचून बाहेर काढण्याने अनेकांचे जीव वाचल्याचे व्यवस्थापक मयुरेश साखरकर यांनी सांगितले. पुढील काळात एकही अपघात होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.जेटीजवळील भागात पाण्याचा प्रवाह बदलून व खोलवर पाण्यात गेल्याने पर्यटक प्राणास मुकले आहेत. ेअशावेळी जेटीजवळील काही मीटर भाग हा निषिद्ध क्षेत्र करावा तसेच एक विशिष्ट जागा ठरवून येथील प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.सागरी सुरक्षारक्षक तसेच यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना वेगळी ओळखपत्र देता येतील, असे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. गहागरला सुरक्षित पर्यटन करुया, असे आवाहन शेवटी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, अ‍ॅड. संकेत साळवी, राजन दळी, राजेंद्र आरेकर, नरेश पवार, श्यामकांत खातू, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, बंदर विभागाचे अभिजीत गोळे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोवा तसेच इतर समुद्री पर्यटन भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रात डुंबत असताना येथे कायम सुरक्षा रक्षक देखरेख करत असतात. किती पाण्यात जावे, कुठे पोहू नये अशा प्रकारच्या सूचना करत असल्याने येथे अपघात होत नाहीत अशा प्रकारची सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. यावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपंचायत कंत्राटी सुरक्षारक्षकनेमण्याबाबत पुढाकार घेईल, असे सांगितले.