डी.एड.धारकांना मिळणार अंशकालीन शिक्षक नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:23+5:302021-05-24T04:29:23+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील शिक्षकांची ९१४ रिक्त आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पदवीधर डी.एड., बी.एड. उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षक सेवकांप्रमाणे काम करणे ...

डी.एड.धारकांना मिळणार अंशकालीन शिक्षक नियुक्ती
रत्नागिरी : जिल्ह्यातील शिक्षकांची ९१४ रिक्त आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पदवीधर डी.एड., बी.एड. उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षक सेवकांप्रमाणे काम करणे संधी उपलब्ध करून देण्याचा विचार जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण व वित्त समिती सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी दिली.
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरी उपलब्ध करून देण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग, मंत्रालय, मंबई व ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये त्या शैक्षणिक वर्षात संचमान्यतेपेक्षा शिक्षकांची पदे कमी असल्यास अथवा अन्य कारणाने संचमान्यतेच्या संख्येप्रमाणे शिक्षक उपलब्ध होण्यास अडचण उभी राहते. शिक्षक उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यामध्ये शिक्षकांची नियमित नियुक्त होईपर्यंत, फक्त त्या शैक्षणिक वर्षासाठी अशा रिक्त पदावर आवश्यकतेनुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या अंशकालीन उमेदवारांना शिक्षण सेवकांप्रमाणे नियुक्ती देता येते. अशा उमेदवारांना शिक्षक सेवकांप्रमाणे नियुक्ती देताना जिल्ह्यातील अंशकालीन उमेदवारांची यादी सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून प्राप्त करून घेऊन नियुक्ती देण्यात येते.
जे डी.एड. व बी.एड. पदवीधारक अंशकालीन पदवीधर आहेत व ज्यांनी सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये अद्याप नावनोंदणी केलेली नाही. अशा पदवीधर अंशकालीन उमेदवारांची नोंदणी करावी. जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची ९१४ पदे रिक्त आहेत. म्हणून जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. पदवीधर उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षण सेवकांप्रमाणे काम करणेस संधी उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाणार असल्याचे सभापती मणचेकर यांनी सांगितले.