विनयभंगाची तक्रार असलेल्या रिक्षाचालकाची आत्महत्या

By मनोज मुळ्ये | Updated: June 24, 2023 10:19 IST2023-06-24T10:17:46+5:302023-06-24T10:19:18+5:30

त्यामुळे खळबळ उडाली आहे.

death of a rickshaw puller who complained of molestation | विनयभंगाची तक्रार असलेल्या रिक्षाचालकाची आत्महत्या

विनयभंगाची तक्रार असलेल्या रिक्षाचालकाची आत्महत्या

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: महाविद्यालयीन युवतीच्या विनयभंगाची तक्रार दाखल असलेला व नुकताच जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने आज शनिवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दहा दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आपण दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे, अश्लील संभाषण केल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीशी संपर्क साधून तिची तक्रार दाखल करुन घेतली व दीड तासात रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला शोधून अटक करण्यात आली.

दोन दिवसाआधीच त्याला जामीन मिळाला होता. आज शनिवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या साईदीप गृहसंकुल शांतीनगर, रसाळवाडी या इमारतीच्या टेरेसवर आढळला. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. तो आपली पत्नी व दोन मुलांसह येथे राहतो.
उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व अंमलदार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय नेण्यात आला.

Web Title: death of a rickshaw puller who complained of molestation