Ratnagiri: मालगुंड किनाऱ्यावर मृत व्हेल माशाचे धूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:33 IST2025-04-11T13:32:35+5:302025-04-11T13:33:10+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेनजीकच्या मालगुंड गायवाडी समुद्रकिनाऱ्यावर व्हेल माशाचे सडलेल्या अवस्थेतील महाकाय धूड समुद्रकिनारी लागले आहे. मालगुंड गायवाडी ...

Ratnagiri: मालगुंड किनाऱ्यावर मृत व्हेल माशाचे धूड
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेनजीकच्या मालगुंड गायवाडी समुद्रकिनाऱ्यावर व्हेल माशाचे सडलेल्या अवस्थेतील महाकाय धूड समुद्रकिनारी लागले आहे.
मालगुंड गायवाडी किनाऱ्यावर ९ एप्रिल रोजी समुद्राच्या पाण्यात महाकाय व्हेल माशाचे कुजलेल्या अवस्थेतील धूड तरंगताना ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी गणपतीपुळे पोलिस चौकीशी संपर्क साधला. चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश गावित, हेडकॉन्स्टेबल नीलेश भागवत, कॉन्स्टेबल आदित्य अंकार यांनी घटनास्थळी भेट दिली व वनविभागाला कळविले.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी किनाऱ्यावर दाखल झाले, मात्र माशाचे धूड पाण्यात असल्यामुळे समुद्राच्या भरतीची वाट बघावी लागली. गुरुवार १० एप्रिल रोजी पहाटे हे धूड किनाऱ्यावर लागले. यानंतर पशुधन पर्यवेक्षक नीलेश वाघमारे यांनी तसेच कांदळवन कक्षाचे किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, वनरक्षक प्राजक्ता चव्हाण, प्रकल्प समन्वयक शुभम भाटकर तसेच कासव मित्र आदर्श मयेकर यांनी विशेष मेहनत घेऊन मृत माशाची विल्हेवाट लावली.