शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत आराम बसने घेतला पेट, एकजण भाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:53 IST

Fire Dapoli Ratnagiri- दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अश्विनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या आराम बसला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १०.२८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला असून, त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदापोलीत आराम बसने घेतला पेट, एकजण भाजला प्रसंगावधान राखत गाडी नेली पंपाबाहेर - सुदैवाने मोठा अनर्थ टळला

दापोली : शहरातील मेहता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अश्विनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या आराम बसला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १०.२८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला असून, त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पेट्रोल पंप मालक आशिष मेहता, प्रसाद मेहता यांनी प्रसंगावधान राखत पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर घेऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला. तत्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बसने अचानक पेट घेतल्याने जीव वाचवण्यासाठी पंपातील कर्मचारी धावत होते.तसेच पंपातील इतर वाहने इतरत्र हलविण्यात आली. परंतु, आगीचा भडका उडण्याआधीच आशिष मेहता, प्रसाद मेहता या दोन बंधूंनी मोठ्या हिमतीने पेटलेली गाडी पंपाच्या बाहेर काढली. या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलने भरलेला टँकर उभा होता. तसेच पेट्रोल-डिझेलने भरलेल्या दोन्ही टाक्या फुल होत्या. आगीचा भडका उडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.आशिष मेहता व प्रसाद मेहता या दोन्ही बंधूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने ही गाडी बाहेर काढल्याने मोठा धोका टाळला. तसेच प्रसंगावधान राखत सुजय मेहता, ऋषी मालू यांनी फायर बॉलच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :fireआगDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी