दापोलीत आराम बसने घेतला पेट, एकजण भाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:53 IST2020-12-28T17:52:36+5:302020-12-28T17:53:54+5:30
Fire Dapoli Ratnagiri- दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अश्विनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या आराम बसला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १०.२८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला असून, त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दापोलीत आराम बसने घेतला पेट, एकजण भाजला
दापोली : शहरातील मेहता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अश्विनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या आराम बसला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १०.२८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला असून, त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पेट्रोल पंप मालक आशिष मेहता, प्रसाद मेहता यांनी प्रसंगावधान राखत पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर घेऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला. तत्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बसने अचानक पेट घेतल्याने जीव वाचवण्यासाठी पंपातील कर्मचारी धावत होते.
तसेच पंपातील इतर वाहने इतरत्र हलविण्यात आली. परंतु, आगीचा भडका उडण्याआधीच आशिष मेहता, प्रसाद मेहता या दोन बंधूंनी मोठ्या हिमतीने पेटलेली गाडी पंपाच्या बाहेर काढली. या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलने भरलेला टँकर उभा होता. तसेच पेट्रोल-डिझेलने भरलेल्या दोन्ही टाक्या फुल होत्या. आगीचा भडका उडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
आशिष मेहता व प्रसाद मेहता या दोन्ही बंधूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने ही गाडी बाहेर काढल्याने मोठा धोका टाळला. तसेच प्रसंगावधान राखत सुजय मेहता, ऋषी मालू यांनी फायर बॉलच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.