खेड : मुंबई - गोवा महामार्गावर भरणे नजीक धावत्या स्विफ्ट कारमध्ये एका तरूणाने ब्लेडच्या सहाय्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही समाजसेवकांनी पाठलाग करून या तरुणाला पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.महामार्गावरील भरणेजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. या तरुणाची तालुक्यातील एका गावात सासुरवाडी आहे. सकाळी भरणे नाका येथून मुंबई गोवा महामार्गावरून हा तरुण साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्याने सातारा येथील त्याच्या नातेवाईकांना आपण आपलं जीवन संपवत असल्याचे फोन वरून सांगितले. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी खेडमधील काही ओळखीच्या लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर खेडमधील काही तरुणांनी त्याचा शोध सुरू केला.मारुती स्विफ्ट कारने भरधाव वेगाने भरणे येथून जात असताना तो आढळला. त्यानंतर शोधकार्यात असलेल्या तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता एका पेट्रोल पंपानजीक त्याला थांबवले. तरुणांनी जेव्हा त्याच्या कारकडे धाव घेतली तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वच हैराण झाली. या तरुणाने आपल्या हाताची नस कापून घेतली होती. त्यामुळे गाडीत अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. तरुणाचे कपडे देखील रक्ताने माखले होते.
धावत्या कारमध्ये तरूणाने घेतली नस कापून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:49 IST
Crimenews, highway, suicide, ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गावर भरणे नजीक धावत्या स्विफ्ट कारमध्ये एका तरूणाने ब्लेडच्या सहाय्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही समाजसेवकांनी पाठलाग करून या तरुणाला पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.
धावत्या कारमध्ये तरूणाने घेतली नस कापून
ठळक मुद्देधावत्या कारमध्ये तरूणाने घेतली नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न