शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘सोळकोबा-बाळकोबां’साठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:53 IST

मानाचे गणपती : मांडवीतील घरगुती गणेशाला सार्वजनिक रूप

रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे शिवलकर घराण्यांचे व त्यांच्या आठव्या पिढीचे आराध्य दैवत सोळकोबा-बाळकोबाच्या दर्शनास भाविकांची गर्दी होत आहे. शिवलकर कुटूंबियांचा हा उत्सव असला तरी संपूर्ण मांडवी गाव या उत्सवात सहभागी होत असल्यामुळे वेगळेच चैतन्य निर्माण होते. शाडूच्या मातीपासून सोळकोबा व बाळकोबा यांच्या मूर्ती तयार केल्या जातात. आजपर्यत अनेक नामवंत मूर्तीकारांना दोन्ही मूर्ती तयार करण्याचा मान मिळाला आहे. रामआळीतील कै. बाबूराव पाटणकर यांच्यासह त्यांच्या तीन पिढ्यांनी मूर्ती साकारली आहे. त्यानंतर पुंडलिक शिवलकर यांनी ३० वर्षे, अमित पेडणेकर यांनी ८ वर्षे तर स्वत: राजेश शिवलकर गेले अनेक वर्षे ही गणेशमूर्ती तयार करीत आहेत. प्रसिध्द मूर्तीकार घनश्याम भाटकर यांनीही सोळकोबा व बाळकोबांच्या मूर्ती घडविल्या आहेत. सोळकोबाची मूर्ती गेली दहा वर्षे अमित पेडणेकर घडवत आहेत. दोन्ही मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे इको फे्रंडली गणेशमूर्ती आहेत. कारण शाडूप्रमाणे रंगकामासाठी केवळ जलरंग वापरले जात आहेत. मांडवी गावात गणेशोत्सवाची सुरूवात बाळकोबा - सोळकोबा यांच्या प्रतिष्ठापनेपासून होते. शहरातील अनेक नागरिक बाळकोबा गणपतीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय स्वत:च्या गणपतीची प्रतिष्ठापना करत नाहीत. बाळकोबाच्या प्रतिष्ठापनेसाठी वेदमूर्ती चिंतुकाका जोशी आवर्जून उपस्थित राहतात. त्यांची ही सातवी पिढी आजही श्रींच्या सेवेत आहेत. सोळकोबा - बाळकोबा गणपतींचे विसर्जन गौरी - गणपतीच्या दिवशी केले जाते. खांद्यावरून विसर्जनासाठी रत्नागिरीचे मानाचे हे दोन गणपती निघाले की, भाविकांची गर्दी होते. मांडवी किनाऱ्यावर देखील सोळकोबा व बाळकोबाच्या दर्शनासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. (प्रतिनिधी)