शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, चुलतभावाचा केला निर्घृण खून; परप्रांतीय कामगारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:04 IST

देवगड वरेरी येथील चिरेखाणीवरील घटना 

देवगड : सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही. या क्षुल्लक कारणावरून एका परप्रांतीय कामगाराने आपल्या चुलतभावाच्या डोक्यात टॉमी मारून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक एका चिरेखाणीवर घडली आहे.कृष्णकुमार जुगराज यादव (वय २०, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रितीक दिनेश यादव (२०, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) याला देवगड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर आठ ते दहा परप्रांतीय कामगार काम करत आहेत. त्यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व रितीक यादव हे दोघेही होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही भाऊ चिरेखाणीवरील एका ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी रितीक याचा सिगारेट ओढण्याचा लायटर कृष्णकुमारजवळ होता. रितीक याने तो मागितल्याने दोघांत वाद झाला. कृष्णकुमारने रितीक याच्या कानशिलात लगावली व तो ट्रकबाहेर आला. चिडलेला रितीक ट्रकमधील टॉमी घेऊन गेला आणि चिरेखाणीजवळ कृष्णकुमार याच्या डोक्यात टॉमीने जोरदार प्रहार केला. वार वर्मी लागल्याने कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टॉमी चिरेखाणीतील पाण्यात फेकून देत रितीकने तेथून काढता पाय घेतला.दरम्यान, तळेबाजार येथे राहणारा चिरेखाणीचा मुकादम विजय अण्णापा शेंडगे हा बुधवारी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे तो चिरेखाणीवर गेला. तेथे कृष्णकुमार व रितीक हे न दिसल्याने त्यांनी इतर कामगारांसमवेत त्या दोघांचा चिरेखाण परिसरात शोध घेतला. यावेळी कृष्णकुमार हा चिरेखाणीत मृत अवस्थेत दिसला तर रितीकचा शोध घेतला तेव्हा तो तळेबाजार बाजारपेठेत दिसला.मुकादम शेंडगे यांनी ही माहिती पोलिस पाटील मुकेश पारकर यांना फोनवरून दिली. पारकर यांनी देवगड पोलिस ठाण्यात कळविले. त्यानंतर देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रितीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.घटनास्थळी तपासकार्यात पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर, दीपेश तांबे, रवींद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वरेरी सरपंच प्रिया गोलतकर, पोलिस पाटील मुकेश पारकर, चिरेखाण मालक उमेश गवाणकर उपस्थित होते.खुनाचा गुन्हा दाखलघटनेची माहिती मुकादम विजय अण्णापा शेंडगे यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिली. रितीक यादव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.