Coronavirus: एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; रत्नागिरित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली ५ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 09:20 AM2020-04-10T09:20:43+5:302020-04-10T09:23:31+5:30

साखरतर मधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे नमुने  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

Coronavirus: One woman reported positive; The number of corona artery patients reached 5 in ratnagiri | Coronavirus: एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; रत्नागिरित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली ५ वर

Coronavirus: एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; रत्नागिरित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली ५ वर

Next

रत्नागिरी -  साखरतरमधील कोरोनाची लागण झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. ही महिला ४९ वर्षाची असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये मध्ये उपचार सुरू आहेत.

साखरतर मधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे नमुने  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी कोरोना बाधित महिलेची नातेवाईक असलेल्या एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.  खेड येथे कळंबणी रुग्णालयात कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. तर गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील कोरोना रुग्ण बरा झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या वाढत असून बाहेरून आलेल्या नागरिकांना स्वताहून उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाने केले आहे. रत्नागिरीत आतापर्यंत 5 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे.  3 रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Coronavirus: One woman reported positive; The number of corona artery patients reached 5 in ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.