CoronaVirus :जिल्हा शासकीय रूग्णालयातील अपघात विभाग स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:11 IST2020-06-10T16:09:56+5:302020-06-10T16:11:24+5:30
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता जिल्हा शासकीय रूग्णालयातील अपघात विभाग व ओपीडी शहरातील मजगाव रोड येथील केएसपी रेसिडेन्सीनजीक स्थलांतरित करण्यात आली आहे.

CoronaVirus :जिल्हा शासकीय रूग्णालयातील अपघात विभाग स्थलांतरित
रत्नागिरी : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता जिल्हा शासकीय रूग्णालयातील अपघात विभाग व ओपीडी शहरातील मजगाव रोड येथील केएसपी रेसिडेन्सीनजीक स्थलांतरित करण्यात आली आहे.
जिल्हा रूग्णालयाने खबरदारी म्हणून ही उपाययोजन केली आहे. कोरोनाचे संकटामुळे जिल्हा शासकीय रूग्णालय पूर्णत: कोरोना रूग्णालय करण्यात आले. त्यानुसार शहरातील खासगी रूग्णालये, शिर्के हायस्कूल या ठिकाणी शासकीय रूग्णालयाचे विविध विभाग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर अपघात विभागही स्थलांतरित करण्यात येणार होता.
मंगळवारी या रूग्णालयाच्या अपघात विभागाचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता अपघात विभागात येणाऱ्या रूग्णांना शहरातील मजगाव रोड येथील केएसपी रेसिडेन्सीनजिकच्या रूग्णालयात जावे लागणार आहे.