शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:50 AM

कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी

चिपळूण : कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.ते म्हणाले की, आजही कोरोना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. हा भाग सुरक्षित असल्याने शक्य तेवढ्या नागरिकांना गावी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग आठ दिवस बससेवा सुरू करून चालत येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या माथी मारणेदेखील पूर्णत: चुकीचे आहे. या संकटात चाकरमान्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अथवा सेवा मिळालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यांनी सांगितले की, मार्गताम्हाणे येथे तपासणी नाक्यावर विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे शिवसेनेतर्फे तंबू, केबीन व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सावर्डे नर्सिंग सेंटर, कामथे येथील समाजकल्याण वसतिगृहाची डागडुजी करून तेथेही जादा खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.तसेच गुहागरसाठी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी चार जागांची पाहणी केली जात आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला असला, तरी आपण आपल्या आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर सावर्डे येथेही कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई