शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

CoronaVirus Lockdown : अखेर तळीरामांची प्रतीक्षा संपली, रत्नागिरीतील वाईन शॉपी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:12 PM

आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली.

ठळक मुद्देअखेर तळीरामांची प्रतीक्षा संपली, रत्नागिरीतील वाईन शॉपी सुरुसोशल डिस्टन्स पाळत खरेदी, मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर रांगा

रत्नागिरी : आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली.लॉकडाऊनच्या काळात तब्बल ५६ दिवसांपेक्षा अधिक काळ मद्याची दुकाने बंद राहिली. या कालावधीत राज्य शासनाने मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. परंतु, अनेक जिल्ह्यात दारू दुकानांवर मोठी गर्दी झाली.

यामुळे जिल्ह्यात अद्यापर्यंत दुकाने उघडली नव्हती. त्यानंतर ऑनलाईन मद्यविक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, अवघ्या काही तासात हा निर्णय मागे घेण्यात आला होता. ऑनलाईन विक्रीचा निर्णय मागे घेत दुकानांमध्येच मद्य विक्रीची मुभा देण्यात आली.मात्र, शहरात मद्यविक्री दुकाने उघडण्यात अडचणी आल्या. ग्रामीण भागातील दुकाने मात्र सुरू झाले. परंतु शहरातील दुकाने शुक्रवारपासून सुरू झाली. ऑनलाईन आणि थेट दुकानांत मद्य विक्री सुरू झाली. मद्यपींनी देखील मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच दुकानांबाहेर रांग लावली. सोशल डिस्टन्स पाळत अनेकांनी दारू खरेदी केली.

काहींनी दुकानाबाहेर सॅनिटायझर घेऊन कर्मचाऱ्याला उभे ठेवले होते. दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊनच दुकानात पाठवले जात होते. तर काहींनी केवळ एकच ग्राहक दुकानात येईल अशी व्यवस्था केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीRatnagiriरत्नागिरी