CoronaVirus Lockdown : रत्नागिरीत एका शर्विलकाने चोरले चक्क दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:16 IST2020-05-07T15:09:52+5:302020-05-07T15:16:01+5:30
लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पसरलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत एका शर्विलकाने चक्क दुकानाबाहेर ठेवलेले दूधच चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी रत्नागिरीत घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची कृती व्यवस्थित चित्रित झाली आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

CoronaVirus Lockdown : रत्नागिरीत एका शर्विलकाने चोरले चक्क दूध
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पसरलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत एका शर्विलकाने चक्क दुकानाबाहेर ठेवलेले दूधच चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी रत्नागिरीत घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची कृती व्यवस्थित चित्रित झाली आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरातील राम नाका हा सर्वाधिक गजबजलेला भाग. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट पसरला आहे. त्याचा गैरफायदा घेत गुरूवारी सकाळी एका चोरट्याने राम नाका येथील एका दुकानाच्या बाहेर कोपऱ्यात ठेवलेल्या दुधाच्या क्रेटमधील सर्व दूध पिशव्या आपल्या पिशवीत भरून घेतल्या.
अतिशय शांतपणे हे काम करून तो शांतपणे निघूनही गेला. तेथील सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य चित्रित झाले असून, त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्याचवेळी आसपासच्या अन्य सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहराही पूर्णपणे व्यवस्थित दिसत आहे.