CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आणखी चार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:37 IST2020-05-08T16:36:38+5:302020-05-08T16:37:44+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहे

CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आणखी चार कोरोनाबाधित
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहे
नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी रत्नागिरी शहरातील आहे. ती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. यामुळे रत्नागिरी शहरात पुढील काही दिवस बंधने लागू करण्यात येणार आहेत. शुक्रवारी मिळालेल्या कोरोनाबाधितांमध्ये तीनजण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
वाढणारे बहुतांश रुग्ण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. परंतु नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.