CoronaVirus Lockdown :२० दिवसात रेल्वेने ६८,७५९ कामगार त्यांच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:25 IST2020-05-29T17:22:05+5:302020-05-29T17:25:04+5:30
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५,६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.

CoronaVirus Lockdown :२० दिवसात रेल्वेने ६८,७५९ कामगार त्यांच्या घरी
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५,६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लॉकडाऊन पासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास गाड्या सोडण्यात आल्या.
महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेनमधून १५,६७७ श्रमिक आणि त्याचे कुटुंबीय रवाना झाले. रत्नागिरी - सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेनमधून ४,०१६, बिहारला दोन ट्रेनच्या माध्यमातून २,६४३, कर्नाटकमध्ये तीन ट्रेनच्या माध्यमातून ३,६८०, झारखंड येथे तीन ट्रेनच्या माध्यमातून ३,५०१, मध्यप्रदेशला एक ट्रेनच्या माध्यमातून १,१६४ तर राजस्थानला एका ट्रेनच्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना झाले .
गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातूनही कोकणरेल्वेच्या माध्यमातून श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आले. गोव्यातून ३६ ट्रेन यच्या माध्यमातून ५०,५१८ श्रमिक त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचले. तर कर्नाटकमधून दोन ट्रेनच्या माध्यमातून २,५६४ कामगार आणि कुटुंबियांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.
कोकणरेल्वेच्या मार्गावर श्रमिकांची ही वाहतूक अजूनही सुरु आहे. पुढील काही दिवसात मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या घरी त्यांच्या राज्यात पोहोचवण्यकरिता कोकण रेल्वे ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. गेल्या वीस दिवसात या हजारो कामगारांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि महसूल पोलीस आणि एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हजारो कामगार त्यांच्या सामानासह जाताना करण्यात आलेल्या अचूक नियोजनामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात कोकण रेल्वेला यश आलं.