शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

corona virus : तब्बल सोळा तासांनी कोरोना चाचणी, खासगी रुग्णालयांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:41 PM

तब्बल सोळा तासांनंतर अपघातग्रस्त रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले.

ठळक मुद्देतब्बल सोळा तासांनी कोरोना चाचणी, खासगी रुग्णालयांसमोर प्रश्नअपघातग्रस्त तरूण निगेटिव्ह आल्यावर उपचार

टेंभ्ये : रविवार, दि. २६ रोजी रात्री ८ वाजता अपघात झालेल्या एका रुग्णाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णाचा मेंदूचा स्कॅनिंग रिपोर्ट नॉर्मल आला. परंतु श्वास घ्यायला त्रास होत असल्याने संबंधित रुग्णालयाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना टेस्ट किटची मागणी करण्यात आली. त्यानंतर तब्बल सोळा तासांनंतर या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले.

अपघातग्रस्त रुग्णाला सोळा तास वाट पाहायला लागणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे आमच्या रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.रविवारी रात्री ८ वाजता या रुग्णाचा हातखंबा ते निवळी दरम्यान अपघात झाला. दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने डोक्याला मार लागला होता. डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने तातडीने त्याला रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित रुग्णालयाने अपघातग्रस्त रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेतले व मेंदूच्या दुखापतीसंदर्भातील सर्व चाचण्या केल्या. या चाचण्यांचे सर्व अहवाल चांगले आले. परंतु त्या अपघातग्रस्त रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असल्याचे या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.

रुग्णालयातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे तत्काळ रॅपिड टेस्ट किटची मागणी करण्यात आली. परंतु जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.अशा परिस्थितीत या रुग्णाला सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. स्वॅबही घेण्यात आला. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा या रुग्णाला त्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व त्याच्यावरील पुढील उपचार सुरू झाले.या सर्व प्रक्रियेमध्ये वाया गेलेला सोळा तासांचा कालावधी हा एखाद्या रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. यासाठी अपघातग्रस्त रुग्णांची कोरोना चाचणी तातडीने होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्त रुग्णांना हाताळणाऱ्या खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणीचे किट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अशा सुविधा दिल्या जात नसल्याने कोरोना व्यतिरिक्तच्या गंभीर रूग्णांना दाखल करून घेण्यास अनेकजण टाळत आहेत.उपचार करणार तरी कसे?खासगी रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट किट उपलब्ध नसल्याने या रुग्णाला श्वसनाचा त्रास नेमका कशामुळे होतो, हे ठरवणे रुग्णालयाला शक्य होत नव्हते. कोरोनासदृश लक्षण असल्याने अन्य कोणता उपचारही करता येत नव्हता. अशीच स्थिती सर्वच खासगी रूग्णालयांची झाली असून, उपचारात अडचणी येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघातRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल