कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:30+5:302021-09-14T04:37:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना होऊन गेला इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, असा नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. मात्र, ...

कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? संभ्रम कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना होऊन गेला इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, असा नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. मात्र, अशा रुग्णांच्या फुप्फुसाचे कार्य पूर्ण क्षमतेने सुरू असेल, त्याची शरीराची सर्व कार्ये सुरळीत सुरू असेल तर अशा रुग्णांच्या तत्काळ किंवा नियोजित शस्त्रक्रिया करण्यास कोणताच अडथळा नसल्याचे आरोग्य तज्ज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहेत.
कोरोना होऊन गेल्यानंतर जर त्या व्यक्तीची तातडीची शस्त्रक्रिया करावी लागल्यास त्या व्यक्तीला कमालीचा थकवा असेल आणि फुफ्फुसे कार्यक्षम नसतील तर शस्त्रक्रिया करणे त्या रुग्णाच्या दृष्टीने धाेकादायक असते. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
n कोरोनातून बाहेर पडलेल्या रूग्णाला कमालीचा थकवा जाणवतो. काहींच्या फुप्फुसांवर कोरोना आघात करतो.
n मेंदूविकार, किडनी, ॲंजिओप्लास्टी, अपेंडिक्स आदी तातडीच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीची शारीरिक क्षमता पाहिली जाते.
प्लान शस्त्रक्रिया
n कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला थकवा असतो. जीवनसत्त्वांचा ऱ्हास झालेला असतो. त्यामुळे किमान महिनाभर तरी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातात.
n मात्र, रूग्ण काही कालावधीनंतर सर्व प्रकारे सक्षम झालेला असेल तर त्याची नियोजित शस्त्रक्रिया करण्यास हरकत नसते.
शस्त्रक्रियेसाठी फुप्फुसे कार्यक्षम हवीत
कोरोना झालेल्या व्यक्तीला कमालीचा थकवा जाणवत असतो. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडलेल्या व्यक्तीची फुप्फुसे कमकुवत होतात. अशा व्यक्तींचे हृदयावरील अथवा अन्य गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात, अन्यथा शस्त्रक्रिया केल्या जातात.
कोरोनामुक्त रुग्णाची तातडीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या फुप्फुसाची कार्यक्षमता मजबूत आहे ना? त्याच्यातील रक्ताच्या गुठळ्यांचे प्रमाण कसे आहे, आदी सर्व चाचण्या केल्या जातात. भूलतज्ज्ञ तपासणी करूनच त्या व्यक्तीच्या तातडीच्या शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय घेतात.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी