विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:15 AM2019-10-11T00:15:14+5:302019-10-11T00:17:04+5:30

राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत

 Conquest of Mahayuti, but no one in the bouquet | विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

Next
ठळक मुद्देमूळ प्रश्नाला बगल देत दिले उत्तर

रत्नागिरी : राज्यभर महायुती आहे, कणकवलीतही महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत सेनेच्या उमेदवाराने माघार का घेतली नाही, या प्रश्नाला बगल देत नेमका कोण निवडून येणार हे सांगणे टाळले.

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या प्रदेशकडून आधी मंजूर करून घेतल्या आहेत. त्या नियुक्त्या योग्यच आहेत, असे स्पष्ट करीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांची पाठराखण केली आहे. पदनियुक्तीवरून जिल्हाध्यक्ष पटवर्धन व माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यात जोरदार वादंग झाले होते. याबाबत विचारता लाड बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लाड म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने गेल्या पाच वर्षात विकासाची जी कामे केली आहेत, त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हा विश्वास आहे. सरकारवर आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. विरोधकांमध्ये आता जान उरलेली नाही. ते हतबल झाले आहेत. राष्ट्रावादीतील नेत्यांनी साथ सोडल्यानेच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयातही प्रचारासाठी जावे लागतेय. कॉँग्रेसही हतबल झाली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५पेक्षा अधिक जागा मिळतील व पुन्हा सत्ता येईल, असा दावा लाड यांनी केला.

नाणार प्रकल्पाचा पुनर्विचार
नाणार पुन्हा आणणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर व रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी केले होते. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना नाणार कसा काय आणला जाणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर लाड म्हणाले, नाणार प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांचीच मागणी आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार आहे. स्थानिकांना विकास हवा आहे. निवडणुकीनंतर उच्चस्तरीय समितीमार्फत नाणारबाबतची भूमिका पुन्हा ऐकून घेतली जाणार आहे.
 

Web Title:  Conquest of Mahayuti, but no one in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.