शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

काथ्या व्यावसायिक महिलांसाठी जोडधंदा

By admin | Updated: November 15, 2015 23:54 IST

सहकार्यातून वेंगुर्लेत फुलली झेंडू शेती

सावळाराम भराडकर- वेंगुर्ले --काथ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना जोडधंदा देण्याच्या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे यांनी केलेल्या सहकार्यातून महिलांनी झेंडूची बाग फुलविली आहे. झेंडूच्या उत्पादनातून आर्थिक प्राप्तीतून समृद्धता निर्माण करण्यात या महिला यशस्वी झाल्या आहेत. वेंगुर्ले कॅम्प येथे महिला काथ्या कामगार आौद्योगिक सहकारी संस्थेच्या दहा गुंठे क्षेत्रात कलकत्ता आॅरेंज या झेंडूच्या फुलांची नाविन्यपूर्ण अशी फुललेली शेती जिल्ह्यात नावलौकीक मिळवित आहे. महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रकल्पातून वेंगुर्ले कॅम्प येथे महाराष्ट्र राज्यातील पहिला काथ्या व्यवसाय महिला चालवतात. संस्थेचे मार्गदर्शक एम. के. गावडे यांच्यामार्फत काथ्या व्यवसाय वाढीबरोबरच नवनवीन उत्पादने कशी घ्यावीत, याबाबत वेळोवेळी याची माहिती दिली जाते. या प्रकल्पाच्या प्रवर्तक व महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांचे या महिलांना मार्गदर्शन लाभते. काथ्या प्रकल्पाच्या जागेत काथ्या व्यवसाय न करता महिलांना नाविन्यपूर्ण शेतीचा अभ्यास व्हावा, या हेतूने गावडे यांनी महिलांना एकत्रित करून प्रकल्पाच्या दहा गुंठे क्षेत्रात अत्याधुनिक कलकत्ता आॅरेंज या झेंडू फुलाची शेती केली. सुमारे साडेतीन हजार रोपे या क्षेत्रात लागवड केली असून, दिवसाकाळी ४० किलो झेंडूचे उत्पादन मिळत आहे. येथीलच महिला व पुरूष कामगार या झेंडू शेतीत नियमित पाणी, सेंद्रीय खत, कोकोपीठ व औषध फवारणी करून त्या झेंडूच्या रोपांची निगा राखतात.जुलै महिन्यात लागवड केलेल्या या झेंडूच्या शेतीतून दसऱ्यानंतर दीपावलीत या झेंडूच्या फुलांना अधिक बहर येत आहे. स्थानिक बाजारपेठेत ही झेंडूची फुले १०० ते १२० किलो भावाने विक्री होते. काही बडे व्यावसायिक येथूनच ही फुले स्थानिक बाजारपेठेबरोबर इतरही बाजारपेठेत पाठवितात. सतत दोन वर्षे ही शेती सुरू असून, यातून येथील महिला कामगारांना रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे. ही शेती पाहण्यासाठी विविध भागातून शेतीप्रेमी, तरूण फुलशेती करणारे शेतकरी येतात व त्यांना येथे मार्गदर्शन केले जाते. या नाविन्यपूर्ण शेतीचे कौतुक केले आहे.