पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:01 IST2020-06-23T19:00:17+5:302020-06-23T19:01:04+5:30

चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.

Confusion in Panchnama: Harnai villagers besiege Sarpanch | पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

ठळक मुद्देपंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव ग्रामस्थांच्या रोषाला तहसीलदारांनाही जावे लागले सामोरे

शिवाजी गोरे

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै ग्रामपंचायतीच्या पंचनाम्यात घोळ असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त लोकांना शासनाकडून मदत मिळाली नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत.

या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.

हर्णै ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ग्रामस्थांनी त्यांनाही घेराव घालला. चुकीचे पंचनामे करणाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Confusion in Panchnama: Harnai villagers besiege Sarpanch