शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचे सांडपाणी उघड्यावर

By admin | Updated: November 1, 2015 00:09 IST

लोटे औद्योगिक वसाहत : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रंग उत्पादन करणारी दीपक केमटेक्स प्रा. लि. या कंपनीचे घातक रासायनिक सांडपाणी दिवसाढवळ्या कंपनीच्या गटारातून पाईपद्वारे सोडत असताना माजी शिवसेना शाखाप्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन हरीश्चंद्र आंब्रे यांनी रंगेहाथ पकडले व त्याचे छायाचित्रही घेतले. मात्र, कंपनीचे व्यवस्थापन त्याची जबाबदारी घेत नसल्याचे आंब्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर ए. एस. महाडिक यांची भेट घेतली असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मागील वीस ते पंचवीस वर्षापासून ही कंपनी आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रंग उत्पादन करण्याचे काम करत आहे. यापूर्वीच्या व्यवस्थापनाच्या कामगिरीबद्दल मला जास्त माहिती नाही. मात्र, मागील आठ महिन्यांपासून मी इथे फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. हे करत असताना कंपनीचे सर्व कामकाजामध्ये मी आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असून, कंपनीतीलच काही कर्मचारी माझ्यावर राजकीय दबाव आणू पाहत आहेत, असे सांगितले. कंपनीला बदनाम करण्याचे त्यांचे षडयंत्र असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. संबंधीत विषारी सांडपाणी घटनेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता असे काहीच घडले नसल्याचे महाडिक यांनी ठामपणे सांगितले. यावर्षीचा बावीस टन घनगाळ आम्ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तळोजा, नवी मुंबई येथे पाठवला आहे. अमोनियम सल्फेट, सोडीयम सल्फेट यासारखे सात प्रकारचे उत्पादन आम्ही कच्चा माल म्हणून वापरतो व त्यापासून (अइठकठए- डाईज-५०) हे पक्का माल म्हणून तयार केले जाते. उत्पादनासाठी दररोज पंधराशे लिटर पाणी आम्ही वापरतो व त्यातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार आम्ही ईटीपी कार्यान्वित केला आहे. अधिकाधिक बदल घडवून कंपनीचे बदनाम झालेले नाव मला पुसून टाकायचे असल्याचे त्यांनी सांगितले. याउलट माजी शाखाप्रमुख सचिन आंब्रे यांच्या म्हणण्यानुसार या कंपनीत कोणतीही रासायनिक सांडपाणी सोडण्याची वा प्रक्रिया करण्याची योग्य व्यवस्था नसून, बांधण्यात आलेली ईटीपी ही टढउइ च्या नियमाच्या धोरणाबाहेर आहे. त्यामुळे दररोज रात्रीच्यावेळी ही कंपनी आपले सांडपाणी उघड्यावर सोडत असून, ग्रामपंचायतीने गावात मारलेल्या बोअरवेल व नैसर्गिक विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत, असे सांगितले. (वार्ताहर) सचिन आंब्रे : कोणतीही प्रक्रिया नाही कंपनीत कोणतीही रासायनिक सांडपाणी सोडण्याची किंवा प्रक्रिया करण्याची योग्य व्यवस्था नाही. कंपनीत बांधण्यात आलेली ईटीपी ही एमपीसीबीच्या नियमाच्या धोरणाबाहेर आहे. त्यामुळे दररोज ही कंपनी रात्रीच्यावेळी उघड्यावर पाणी सोडत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने गावात मारलेल्या बोअरवेल व नैसर्गिक विहिरी निकामी ठरत आहेत. कोणताही घनगाळ मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठवलेला नाही. घनगाळ कंपनीच्या आवारातच जमिनीत गाडला जात आहे. हे पुराव्यानिशी सिद्धी करून दाखवले जाईल. प्रदूषण मंडळाने तत्काळ या कंपनीच्या आवाराची पाहणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.