शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘कोमसाप’च्या साहित्य यात्रेला प्रारंभ

By admin | Updated: November 15, 2015 23:46 IST

करुळ ग्रंथालयात ग्रंथदिंडीचे उद्घाटन : विनायक राऊत, मधु मंगेश कर्णिकांची उपस्थिती

कणकवली: सर्वत्र साहित्य क्षेत्रात प्रांतवाद, जातीयवाद, भाषावाद जाणवतो. परंतु कोकणातील साहित्यक्षेत्रात आजही असा भेद नाही. आजही कोकण प्रांतात साहित्यिकांत एकात्मभाव आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केशवसुत कोकण साहित्य यात्रेचा रविवारी करूळ येथे प्रारंभ झाला. या यात्रेचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार राऊत यांच्या हस्ते नारळ फोडून करूळ येथील मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयात गं्रथदिंडीचा प्रारंभ झाला. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात ग्रंथदिंडीला खासदार राऊत, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आदींनी खांद्यावर घेतले. ग्रंथालयापासून नाथ पै प्रबोधिनी हायस्कूलपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. हायस्कूलमध्ये उद्घाटनपर कार्यक्रम झाला. यावेळी खासदार राऊत, मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त भास्कर शेटये, अरूण नेरूरकर, एल.बी.पाटील, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, विलास साळसकर, जयेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर करंदीकर, नाथ पै प्रबोधिनी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष अनुप कर्णिक, भरत गावडे, मधुसूदन नानिवडेकर, रूजारिओ पिंटो, दादा मडकईकर, वृंदा कांबळी, कल्पना बांदेकर, वैशाली पंडीत, पत्रकार शशी सावंत, अशोक करंबेळकर, करूळ माजी सरपंच दत्तात्रय फोपे आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत म्हणाले की, ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी आम्हाला मिळाली असली तरी तुम्ही साहित्यिकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे आणि आम्ही तुमच्या आज्ञा पाळू. याच हेतूने आम्ही दिंडीत सहभागी झालो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही फिरलो. परंतु कोकणात काम करण्याचा आनंद वेगळा कारण साहित्यिकांसारख्या गुणवंत लोकांबरोबर काम करताना साथ मिळते. सिंधुदुर्गात बीएसएनएलच्या साथीने विद्यार्थ्यांसाठी ई-क्लासची संकल्पना राबवण्याचे धाडस केले. तेव्हाही मुंबईतील उद्घाटन कार्यक्रमासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लगेचच मधु मंगेश कर्णिक यांना बोलवण्यास सांगितले, असे गौरवोद्गार विनायक राऊत यांनी काढले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी प्रास्ताविक केले. मधुभार्इंनी लावलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता परिषदेचे साम्राज्य उभे राहिले असून नवोदित साहित्यिक वाढावेत म्हणून ही चळवळ हाती घेण्यात आली आहे. ‘कोमसाप’चे विश्वस्त एल.बी.पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात एकेकाळी कोकणाचे नाव नव्हते. मधुभार्इंच्या प्रयत्नांमुळे कोकण मुख्य प्रवाहात आला आणि कोकणातील साहित्यिक मानाने उभा राहिला.कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, आजचा दिवस कोमसापच्या वाटचालीतील महत्त्वाचा दिवस आहे. मधुभार्इंनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून विखुरलेला कोकण साहित्यिक दृष्ट्या एकात्म केला. संस्थेची प्रगती झाली की वाटचाल यशस्वी म्हटली जाते. ‘कोमसाप’चा आलेख सातत्याने प्रगतीचा आहे. पैशाचा येथे डामडौल नाही तर साहित्यिकांचे राज्य आहे. नाथ पै प्रबोधिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी आभारप्रदर्शन केले. करूळ येथून दिंडी सुकळवाड येथे रवाना झाली. सायंकाळी कणकवलीत प. पू. भालचंद्र आश्रमात कविसंमेलन झाले. (प्रतिनिधी)संघटीत कार्य करणारी ‘कोमसाप’: नमिता कीरकोकणच्या साहित्यक्षेत्राला कोमसापने अस्मिता दिली. लोक लिहिते झाले. माणसे लिहायला लागली म्हणजे विचार करू लागली. संघटीतपणे कार्य करणारी कोमसापही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यिक संस्था असावी. मालगुंड येथील केशवसुत स्मारक हेसुद्धा परिषदेचे वेगळेपण आहे. राज्यात अन्यत्र साहित्यिकांचे स्मारक उभे राहिलेले नाही, असे प्रतिपादन कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले.